दौऱ्यादरम्यान परब यांनी घेतली रेनबेक्सी कामगार उपोषणकर्त्यांची भेट
आपल्या मडकई मतदारसंघातील दौऱ्यादरम्यान रेव्होलुशनरी गोवन्स चे प्रमुख मनोज परब यांनी “रॅनबेक्सी कंपनीच्या” कामगार उपोषणकर्त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी कामगारांचे प्रश्न जाणून घेतले. उपोषणकर्त्यानी कंपनीद्वारे करण्यात आलेल्या अन्न्यायाची माहिती परब यांना दिली.
मनोज परब यांनी वीस बावीस वर्षे सत्ता भोगणाऱ्या सुदिन ढवळीकर यांच्यावर टीका केली असता ते म्हणाले की, आज रॅनबेक्सी सारख्या कंपनीतील स्थानिक सुमारे वीस पंचवीस वर्षापासून कामाला होते. त्यांनी कष्ट करून ही कंपनी उंचीवर नेवून ठेवली. आज त्याच कामगाराना कामातून काडण्यात येते. त्यांना या वयात कामासाठी परराज्यात पाठविण्याची भाषा बोलली जाते. आज रॅनबेक्सी कंपनीतील तेहत्तिस कामगार एक महिन्यापासून उपोषणाला बसले आहे. असे सर्व असतानासुद्धा आज स्थानिक आमदार त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांची एकदाही भेट घेवू शकले नाही. त्या कामगारांचे गाऱ्हाणे ऐकून घेवू शकले नाही. ढवळीकर पूर्णपणे ह्या उपोषणकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे.
मडकई मतदारसंघातील औद्योगिक वसाहतीत सुमारे तीस चाळीस मल्टीनॅशनल कंपनी असून सुद्धा स्थानिक आमदाराला मडकई वासियांना रोजगार देता आला नाही. मडकई आयडीसीच्या प्रत्येक कंपनीत जवळजवळ सत्तर टक्के परप्रांतीय कामाला आहेत. स्थानिक पंचायतीने तसेच आमदाराने स्थानिकांना या औद्योगिक वसाहतीत कामे मिळावी म्हणून आजपर्यंत काहीच प्रयत्न केले नाही. वेगवेगळ्या व्यासपीठावर ढवळीकर फक्त खोटी आश्वासने देत असतात. राज्यातील बीजेपी सरकार सुद्धा याला तेवढाच जबाबदार आहे. बीजेपी सरकार हे गोवेकराना स्वयंपूर्ण करण्यासाठी नसून त्यांना लाचरित ठेवण्याचे काम करत आले आहे. आम्ही रेव्होलुशनरी गोवन्स पक्ष सतत ह्या पीडित कामगाराबरोबर असून त्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार असल्याचे परब म्हणाले.